
बिग बॉस २० मध्ये सध्या लव्ह गिल आणि स्काउटओपी यांच्यातील नात्याचीच सगळीकडे चर्चा सुरू आहे. लव्ह गिल आणि स्काउटओपीमधील 'भाऊ-बहिणीच्या' नात्यावर कनिका मान हिने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आता बिग बॉस ७ ची विजेती गौहर खान हिनेही लव्हच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत तिला खडेबोल सुनावले आहेत.
१३ नोव्हेंबरच्या एपिसोडनंतर गौहरने शनिवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणाली, "लव्ह गिल अशी वागतेय जणू तिला काहीच माहीत नाही." पुढे गौहरने तिचं वागणं अतिशय चुकीचं असल्याचं म्हटलं. जर तुला या जवळीकीचा त्रास होत होता, तर तू आधीच अंतर का नाही ठेवलंस? असा सवाल तिने केला. "जसा स्काउटओपी डिस्टर्ब झाला, तशी भाऊ-बहिणीच्या नात्याची कोणतीच जबाबदारी उरली नाही का??" असंही गौहरने सुनावले.
जेव्हा लव्ह स्काउटकडे दुर्लक्ष करते किंवा इतरांसोबत वेळ घालवते, तेव्हा तो कसा वागतो, यावर कनिकाने लव्हशी चर्चा केली. स्काउटच्या मनात लव्हबद्दल नक्कीच काहीतरी भावना आहेत, असं कनिकाला वाटतं.
लव्हने मात्र लगेच हे आरोप फेटाळून लावले. आपण स्काउटकडे कधीच त्या नजरेने पाहिलं नसल्याचं तिने स्पष्ट केलं. जेव्हा स्काउट या संभाषणात आला, तेव्हा त्यानेही लव्हबद्दल मनात कोणतीही भावना नसल्याचं सांगितलं. आपण तिला फक्त बहीण आणि एक चांगली मैत्रीण मानतो, असं त्याने स्पष्ट केलं.
पण लव्हने त्याला अचानक 'तू मला बहीण म्हणू नकोस' असं सांगून सगळ्यांनाच धक्का दिला.
अलीकडेच स्काउट आणि लव्ह यांच्यात काही खटके उडाले होते. तिच्या पायजमावरील कमेंटवरून झालेल्या वादानंतर, स्काउटने चक्क डोकं टक्कल केलं. त्याच्या या कृतीने घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याच्या या भावनिक प्रतिक्रियेमुळे आणि त्यांच्यातील संवादावरून आता या मैत्रीचीच जास्त चर्चा रंगू लागली आहे.