
बिग बॉस १९ सुरू झाल्यापासून, लोक हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की या सीझनचा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की अनुपमा फेम गौरव खन्ना हे सर्वाधिक मानधन घेणारे स्पर्धक आहेत.
गौरव खन्ना हे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी कानपूरमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पदवी प्राप्त केली आणि नंतर मार्केटिंगमध्ये एमबीए केले. तसेच त्यांनी जवळपास एक वर्ष आयटी कंपनीत कॉर्पोरेट वर्कर म्हणून काम केले आहे. नोकरी दरम्यान त्यांनी अभिनेता होण्याचा विचार केला आणि नंतर टीव्ही जाहिरातींद्वारे इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. गौरव यांनी 'भाभी' शो पासून टेलिव्हिजनवर सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'कुमकुम- एक प्यारा सा बंधन' आणि 'मेरी डोली तेरे अंगना' सारख्या शोमध्ये काम केले. मात्र, त्यांना खरी ओळख 'सीआयडी' मध्ये सीनियर इन्स्पेक्टर कविन आणि हिट शो 'अनुपमा' मध्ये अनुज कपाडियाच्या भूमिकेतून मिळाली. गौरव यांनी अलीकडेच सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडियाची ट्रॉफी जिंकली होती. रिपोर्ट्सनुसार, गौरव यांना सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडियासाठी दर आठवड्याला २.५ लाख रुपये मिळत होते. कोईमोईनुसार, खन्ना यांची एकूण संपत्ती सुमारे ८ कोटी आहे.
'बिग बॉस १९' चा प्रीमियर २४ ऑगस्ट रोजी झाला. या शोमध्ये १६ स्पर्धकांनी भाग घेतला आहे, जे आहेत, अशनूर कौर, जीशान क्वाड्री, तान्या मित्तल, आवेज दरबार, नगमा मिराजकर, नेहल चुडासमा, अभिषेक बजाज, बसीर अली, गौरव खन्ना, नतालिया जानोसजेक, प्रणित मोरे, फरहाना भट, नीलम गिरी, मृदुल तिवारी, कुनिका सदानंद आणि अमाल मलिक. तुम्ही हा शो जिओ हॉटस्टारवर रात्री ९ वाजता आणि कलर्सवर रात्री १०:३० वाजता पाहू शकता.