Published : May 09, 2025, 06:31 PM ISTUpdated : May 09, 2025, 07:35 PM IST
‘द रॉयल्स’ ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर भूमीने सांगितले की, चित्रपटाच्या चित्रीकरणाआधीच चित्रपट निर्मात्यांनी तिला नायक इशान कट्टरसोबत मैत्री करण्यास सांगितले होते.
‘पडद्यावर तुम्ही पाहत असलेले इंटिमेट सीन्स करणे सोपे नसते. अनेक कलाकारांना अशा वेळी खूपच अवघड वाटते.
25
कारण इंटिमेट सीन्ससाठी रिहर्सल नसतात. थेट कॅमेरासमोर सहकलाकारासोबत जवळीक दाखवावी लागते. पण ‘द रॉयल्स’मध्ये असे सीन्स असले तरी ते करणे कठीण नव्हते,’ असे अभिनेत्री भूमी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
35
आज (९ मे) ‘द रॉयल्स’ ही मालिका नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, ‘चित्रीकरणाआधीच चित्रपट निर्मात्यांनी मला नायक इशान कट्टरसोबत मैत्री करण्यास सांगितले होते. आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले.
काही काळातच आमची मैत्री झाली. आम्ही जवळचे झालो. त्यामुळे इंटिमेट सीन्स करणे कठीण वाटले नाही. मी तेथेही अभिनय एन्जॉय करू शकले,’ असे त्यांनी सांगितले.
55
भूमी पेडणेकर या हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या परिचयाच्या आहेत. यशराज फिल्म्समध्ये त्या सहा वर्षे असिस्टंट कास्टिंग डायरेक्टर होत्या. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.