Bakaiti Season 2: 'बकैती' सीझन २ चा ट्रेलर रिलीज, दिग्दर्शकाने दिलं 'हे' प्रॉमिस

vivek panmand   | CMS
Published : Sep 18, 2026, 08:21 PM IST
Bakaiti Season 2: 'बकैती' सीझन २ चा ट्रेलर रिलीज, दिग्दर्शकाने दिलं 'हे' प्रॉमिस

सार

'बकैती' या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक समर इक्बाल यांच्या मते, या सीझनमध्ये पात्रांमधील नाती आणि विनोद आणखी खुलून दिसतील. राजेश तैलंग स्टारर ही सीरिज झी ५ वर पाहता येईल.

'बकैती'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर गुरुवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. डाईस मीडियाने याची निर्मिती केली असून समर इक्बाल यांनी दिग्दर्शन केलंय. बकैती सीझन २ मध्ये कटारिया कुटुंबाची धम्माल पुन्हा पाहायला मिळणार आहे. यात राजेश तैलंग, शीबा चढ्ढा, तान्या शर्मा आणि आदित्य शुक्ला यांच्यासोबतच देविशी मदान, ऋत्विक नांबियार आणि अशोक चव्हाण हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. https://www.youtube.com/watch?si=ksMvg-MjNYkk-YVM&v=_hK_2sO5yYI&feature=youtu.be

सीझन २ कडून काय अपेक्षा ठेवाल?

दुसऱ्या सीझनबद्दल बोलताना दिग्दर्शक समर इक्बाल म्हणाले, "बकैतीचं जग मला खूप जवळचं वाटतं. हे असं कुटुंब आहे जिथे कोणीही एकमेकांना 'आय लव्ह यू' म्हणत नाही, पण तुम्ही जेवलात की नाही याची नक्की काळजी घेतात. बोलताना मध्येच थांबवतात किंवा न मागता सल्ले देतात. हाच गोंधळ, प्रेम आणि विरोधाभास कटारिया कुटुंबाला खास बनवतो."

ते पुढे म्हणाले, "सीझन २ मध्ये पात्रांच्या आणखी जवळ जाण्याचा माझा प्रयत्न होता. पहिल्या सीझनमध्ये आपण कटारिया कुटुंबाला फक्त पाहिलं, पण दुसऱ्या सीझनमध्ये आपण त्यांच्यासोबत जगणार आहोत. आम्ही सीरिजमधला वेडेपणा आणि विनोद तसाच ठेवलाय, पण यावेळी पात्रांच्या भावना, त्यांची नाती, त्यांचे छोटे-मोठे रुसवे-फुगवे आणि न बोलता येणाऱ्या गोष्टींवर जास्त फोकस केलाय. अशा मातीशी जोडलेल्या कथांना पाठिंबा दिल्याबद्दल आणि बकैतीला पुन्हा प्रेक्षकांसमोर आणल्याबद्दल मी हिंदी झी ५ चा आभारी आहे. ही सीरिज बनवताना खूप मज्जा आली. आता प्रेक्षक पुन्हा कटारिया कुटुंबाला भेटतील यासाठी मी खूप उत्सुक आहे. यात जास्त भावना, जास्त विनोद आणि अर्थातच भरपूर 'बकैती' पाहायला मिळेल."

कलाकारांनी व्यक्त केला आनंद

अभिनेता राजेश तैलंग यांच्या मते, "नवा सीझन तोच जिव्हाळा, विनोद आणि आपलेपणा घेऊन आलाय. यावेळी कटारिया कुटुंब आणखी जास्त 'बकैती' करत परत आलंय."

अभिनेत्री शीबा चढ्ढा म्हणाल्या, "बकैतीची खरी मज्जा ही आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या गोंधळात आहे. आता दोन कटारिया कुटुंब एकाच छताखाली आल्यामुळे साहजिकच जास्त गोंधळ, जास्त वाद आणि भरपूर बकैती होणार आहे. पण त्याचवेळी, या कुटुंबातला वेडेपणा पाहताना तुम्हाला त्यांच्याबद्दल एक जिव्हाळाही वाटेल. या जगात आणि या पात्रांमध्ये पुन्हा परतताना खूप छान वाटलं. ट्रेलर रिलीज झाल्याचा मला खूप आनंद आहे."

बकैतीचा दुसरा सीझन २५ सप्टेंबरला झी ५ (Zee 5) वर रिलीज होणार आहे.

(हेडलाईन वगळता, या बातमीत एशियननेट न्यूजच्या संपादकीय टीमने कोणताही बदल केलेला नाही आणि ही सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित केली आहे.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Katrina Kaif Body Shaming: आई झाल्यावर शरीरात बदल होतात: कतरिनाला बॉडी शेमिंग करणाऱ्यांवर रम्या संतापली
९९ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून ‘गोंधळ’ चित्रपटाची निवड