इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे सापडला वादात, गणेशोत्सवाच्या रीलवरून ट्रोलर्सने सुनावले

Published : Aug 26, 2025, 09:30 AM IST
ATHARVA SUDAME

सार

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अथर्व सुदामेने बनवलेल्या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या रीलवरून वाद निर्माण झाला आहे. ट्रोलिंग आणि धमक्यांनंतर अथर्वने रील डिलीट करून माफी मागितली आहे. ब्राम्हण महासंघानेही अथर्ववर टीका केली आहे.

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे परत एकदा चर्चेत आला आहे. अथर्व सुदामे याने गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामे याने हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एक रिल अथर्व सुदामेनं रील तयार केला होता. या रीलवरून मोठा वाद उफाळला आहे. अथर्वला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात असून त्यानं माफी मागितली आहे.

व्हिडीओ केली डिलीट 

अथर्व सुदामे याने या व्हिडीओवरून माफी मागितली आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील त्यानं बनवला होता. त्याला ट्रोल धमक्या देण्यासोबत शिव्या देण्यात आल्या होत्या. या नंतर त्यानं हा रील डिलीट केला आहे. तसंच कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो, असं अर्थव सुदामे म्हणाला आहे. आता परत एकदा अथर्व टार्गेटवर आला आहे.

अथर्व सुदामेच्या व्हिडिओत काय म्हणाला? 

गणेशोत्सवाच्या आधी अथर्वने हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचा व्हिडीओ बनवला होता. अथर्व गणेशोत्सवाच्या काळात गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तिकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. मूर्तिकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत असतो. तेवढ्या अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात.

तेवढ्यात मूर्तिकार अथर्व सुदामेला विचारतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता... मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला निक्षूण सांगतो. मूर्तिकाराशी बोलताना म्हणतो की, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही... तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील..." या रीलवरून अथर्व टार्गेट झाला आहे.

ब्राम्हण महासंघाने केली टीका 

ब्राम्हण महासंघाने म्हटलं आहे की, "अर्थव सुदामेचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये तो हिंदू-मुस्लिम ऐक्याची काहीतरी अक्कल शिकवतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वत:चं पोटभर! यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस असं म्हटलं आहे.

पुढं बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, दुधात टाकलेली साखर हे साखरेचं काम करतेय की विषाचं काम करतेय हे गेली 700-800 वर्ष हिंदू भोगतोय! हिंदूंनी भोगलेलं आहे. गणपती कसे बसवायचे? कोणाकडून घ्यायचे हा तुझा विषय नाहीये. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. त्यांनी गणपती कोणाकडून घ्यायचे ते तू शिकवू नको. तुझा धंदा करमणुकीचा धंदा कर आणि तेवढ्यापुरता तुझा धंदा मर्यादित ठेव.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!