
चेन्नई: अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी हजेरी लावली. सन ग्रुपने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये विजय हे स्टॅलिन आणि रजनीकांत यांच्यासोबत उभे असल्याचे दिसत आहे. निवडणुकीतील विजयानंतर हे तिघेही पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये एकत्र आले आहेत. सन ग्रुपने शेअर केलेल्या या फोटोमध्ये कलानिधी मारन हेदेखील आहेत. विशेष म्हणजे, केरळचे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.