अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2' चेंगराचेंगरी प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर

Published : Dec 13, 2024, 06:03 PM ISTUpdated : Dec 13, 2024, 06:32 PM IST
Allu Arjun Arrested By Hyderabad Police

सार

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. नागरिक म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले.

हैदराबाद: तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला शुक्रवारी तेलंगणा उच्च न्यायालयाने हैदराबादमध्ये त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा 2: द रुल'च्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला. अल्लू अर्जुन हा अभिनेता असूनही त्याला नागरिक म्हणून जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले न्यायालय?

न्यायालयाने म्हटले की, "तो एक अभिनेता आहे, असे सांगून त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. या पृथ्वीचा नागरिक म्हणून त्यालाही जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे," कोर्टाने मृत व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल सहानुभूती देखील व्यक्त केली. अल्लू अर्जुनला शुक्रवारी सकाळी हैदराबाद पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक करून त्याला हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यानंतर नामपल्ली कनिष्ठ न्यायालयाने त्याला याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनला चंचलगुडा जेलमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर अल्लु अर्जुनच्या वकिलाने तेलंगणा उच्च न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अपील केला आणि तो मंजूर करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

४ डिसेंबरच्या संध्याकाळी 'पुष्पा २' चे स्क्रिनिंग हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये होते. तेव्हा अल्लू अर्जुनही त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी तिथे आला होता. रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टारवर आरोप आहे की त्याने किंवा त्याच्या टीमने किंवा थिएटर व्यवस्थापनाने तेलंगणा पोलिसांना त्याच्या भेटीची माहिती दिली नव्हती. थिएटर व्यवस्थापनाला याची माहिती होती, मात्र पोलिसांना याची माहिती असती तर चित्रपटगृहात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था ठेवता आली असती. याशिवाय प्रेक्षकांच्या प्रवेशासाठी आणि बाहेर पडण्यासाठी थिएटरमध्ये वेगळे गेट नव्हते. थिएटरमध्ये मोठी गर्दी जमली होती. मात्र योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने तेथे चेंगराचेंगरी झाली आणि एका ३९ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला.

वास्तविक, 'पुष्पा २' रिलीज होण्याच्या एक दिवस आधी संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबरला संध्याकाळी या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता. इतर प्रेक्षकांप्रमाणे ३९ वर्षीय एम. रेवती त्यांचे पती एम. भास्कर, ९ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांच्या मुलीसह चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि रेवती आणि त्यांचा मुलगा पती आणि मुलीपासून विभक्त झाले. चेंगराचेंगरीत रेवतीला गुदमरून जीव गमवावा लागला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. अर्जुनला माहिती मिळताच त्याने महिलेच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आणि तिच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. अल्लू अर्जुनने त्याच्यावर दाखल केलेला खटला फेटाळण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती, ज्याची सुनावणी अजून बाकी आहे

 आणखी वाचा-

अल्लू अर्जुनला अटक, संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाई

अल्लू अर्जुन १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज