ऐश्वर्या राय बच्चनने पॅरिस फॅशन वीकमध्ये ब्लॅक काऊचर गाऊन, क्रिस्टल केप आणि डायमंड टियारा घालून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तिचे लालभडक केस, डार्क रेड लिपस्टिक आणि रॉयल स्टाईलमुळे लोरियल पॅरिसच्या रनवेवर एक वेगळीच चमक पाहायला मिळाली.
ऐश्वर्या राय बच्चनने २८ सप्टेंबरला पॅरिस फॅशन वीकमध्ये 'लोरियल पॅरिस ले डेफिले' शोसाठी रॅम्प वॉक करत जुन्या काळातील ग्लॅमरची आठवण करून दिली. आयफेल टॉवर आणि इकोल मिलिटेअरच्या बॅकड्रॉपवर तिने ऑल-ब्लॅक काऊचर लूकमध्ये या शोचा दिमाखदार शेवट केला.
'एक्सप्रेस युअर वर्थ' या थीमवर आधारित लोरियल पॅरिसच्या या नवव्या पर्वात फॅशन आणि मनोरंजन विश्वातील अनेक ग्लोबल ब्रँड अँबेसेडर एकत्र आले होते.
सीरियन लक्झरी लेबल 'यारा शूमेकर'ने डिझाईन केलेला खास ड्रेस ऐश्वर्याने घातला होता. सेलिब्रिटी स्टायलिस्ट मोहित रायने तिचा हा लूक स्टाईल केला होता.
23
ब्लॅक काऊचर लूकला दिला रॉयल टच
ऐश्वर्याच्या या ड्रेसमध्ये ३डी फ्रिंज एम्ब्रॉयडरी केलेला टू-पीस ब्लॅक मखमली गाऊन होता. या फिटिंगवाल्या गाऊनमुळे तिचा लूक रॅम्पवर एकदम उठून दिसत होता.
या गाऊनवर तिने 'यारा शूमेकर'च्या फॉल/विंटर २०२६-२०२७ काऊचर कलेक्शनमधील क्रिस्टल-एम्बेल्शिड मखमली केप घातला होता. या केपच्या बॉर्डरवर मोती आणि क्रिस्टलचं काम होतं, ज्यामुळे या डार्क लूकला एक रॉयल टच मिळाला.
डायमंड टियारा, डायमंड रिंग्ज आणि पंप्स घालून तिने आपला लूक कम्प्लीट केला. 'डाएट सब्या' या फॅशन पेजनेही इन्स्टाग्रामवर ऐश्वर्याच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ शेअर करत तिच्या खास स्टाईलचं कौतुक केलं आहे.
33
ऐश्वर्याच्या लालभडक केसांनी वेधलं लक्ष
तिच्या या काऊचर आऊटफिटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंच, पण ऐश्वर्याच्या नव्या हेअरस्टाईलचीही जोरदार चर्चा झाली. पॅरिसमधील या इव्हेंटसाठी तिने आपले केस लालभडक रंगात रंगवले होते आणि साईड पार्टिंग करत त्यांना सॉफ्ट वेव्ह्ज लूक दिला होता.
विंग्ड आयलायनर, फेदर्ड आयब्रोज, रुज्ड चीक्स, हलकं कॉन्टूरिंग आणि डार्क रेड लिपस्टिकमुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.
लोरियल पॅरिसच्या या इव्हेंटमध्ये अनेक बड्या स्टार्सची मांदियाळी होती. ऐश्वर्याने व्हायोला डेव्हिस, केंडल जेनर, कारा डेलिव्हिंग्ने, जेन फोंडा, इवा लोंगोरिया, अँडी मॅकडॉवेल, सिमोन ॲशले आणि मेरी बोचेट यांसारख्या प्रसिद्ध मॉडेल्ससोबत रॅम्प शेअर केला.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.