काही लोकांकडे खूप वेळ असतो, अभिनेत्री पल्लवी जोशीने विवेक अग्निहोत्रीला घातले पाठीशी

Published : Aug 29, 2025, 06:00 PM IST
pallavi joshi and vivek agnihotri

सार

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या मराठी जेवणावरील वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर पल्लवी जोशीने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, हा नवरा-बायकोमधील एक गमतीशीर संवाद होता आणि लोकांनी त्याचा विपर्यास केला आहे.

सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवण हे गरिबांच जेवण म्हटलं होतं. त्यामुळे बराच गोंधळ आणि वाद निर्माण झालं आहे. सोशल मीडियावर विवेक यांच्यावर टीका करण्यात अली आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारांनी आक्षेप केला आहे. आता पल्लवी जोशीने विवेक यांची बाजू घेतली आहे. त्यांनी हा किस्सा सांगितल्यामुळं अभिनेत्री म्हणाली की, 'तो एक नवरा-बायकोमधील एक साधा आणि विनोदी संवाद होता.

पल्लवी जोशीला काय म्हणाली? 

पल्लवी म्हणते की, 'खरं तर, ते विवेक बोललाच नव्हता, ती कमेंट मीच केली होती. काय आहे ना! काही लोकांकडे खूप वेळ असतो. त्यांना एखाद्या लहानशा किंवा सामान्य गोष्टीमध्येही विनाकारण दोष काढण्याची हौस असते. तो नवरा-बायकोमधील एक गमतीशीर छोटासा संवाद होता. पण, लोकांना ती गोष्ट फारच गंभीर वाटली.' असं पल्लवीने जोशीने म्हटलं आहे.

नवरा-बायकोमध्ये झालेला मजेशीर संवाद 

मला नेहमीच हलकं आणि पौष्टीक खाणं आवडतं. मी फुडी नाहीये. जेवणाची वेळ झाली की जेवण करुन घेते. मी साधं डाळ-भात किंवा डाळ-भाकरी खाते. त्यामुळे माझे मित्र मला म्हणतात की, तु काय असं बॅट-बॉल सारखं करतेस. जरा लोणचं, चटणी असं काही खात जा. पण मी ते खात नाही. कारण एकतर ते आरोग्यदायी नाहीत आणि दुसरं म्हणजे मला इतका वेळच नसतो.

मी असं जेवण ज्यावेळी त्याच्यासाठी जेवण बनवायचो, तेव्हा तो म्हणायचो हे गरिबांच जेवण मला नकोय. त्याला पोळी, चटणी, लोणचं, पापड आदी सगळं भरलेलं ताट त्याला हवं असायचं. तर तेव्हा तो फक्त नवरा-बायकोमध्ये झालेला मजेशीर संवाद होता, असं विवेक अग्निहोत्री म्हटलं आहे. लोकांनी अर्थाचा अनर्थ काढला. काही लोकांनी तर नोटीसही पाठवली की तुम्ही मराठी संस्कृतीचा अपमान केला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!