दिशा पाटणीची बहिण खुशबू पाटणी चर्चेत, खरंच प्रेमानंद महाराजांवर टीका केली होती का?

Published : Jul 31, 2025, 06:48 PM IST

मुंबई - दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी हिने अनिरुद्धाचार्य महाराज यांच्यावर टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यांच्याऐवजी प्रेमानंदजी महाराजांवर टीका करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यावर खुशबूने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

PREV
14
खुशबूने मांडली आपली बाजू

दिशा पटानीची बहीण खुशबू पटानी माजी लष्करी अधिकारी आहे. तिने अनिरुद्धाचार्य महाराजांवर टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला. प्रेमानंदजी महाराजांवर टीका केल्याचे व्हायरल झाल्याने त्यांच्या अनुयायांमध्ये संताप निर्माण झाला. खुशबूने आपली बाजू मांडली आहे.

24
स्त्रीद्वेषाला आव्हान

खुशबूने स्पष्ट केले की तिचे शब्द अनिरुद्धाचार्य महाराज यांना उद्देशून होते. त्यांनी एका प्रवचनात महिलांविषयी केलेल्या वक्तव्याला उत्तर म्हणून तिने हे वक्तव्य केले होते. स्त्रीद्वेषाला आव्हान देणे हा माझा धर्म आहे, असे तिने म्हटले आहे.

34
कायदेशीर कारवाई करावी लागेल

सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून आक्षेपार्ह संदेश आल्यानंतर खुशबूने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद केले. “जर हे सुरूच राहिले तर बदनामीकारक कॉमेट्सविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी लागेल.” असे तिने म्हटले होते.

44
लिव्हिंग रिलेशनमधील महिला

लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या अनिरुद्धाचार्य यांच्या वक्तव्याचा खुशबूने चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या “स्त्रीद्वेषी” विधानांवर तिने त्यांना फटकारले होते.

Read more Photos on

Recommended Stories