स्टार अभिनेत्रीसोबत अफेअर, तिच्यासोबत परदेश दौरे, पत्नीने घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेत सांगितले कारण

Published : Feb 28, 2026, 11:05 AM IST
Actor Vijay Divorce Sangeetha Alleges Extramarital Affair

सार

Actor Vijay Divorce Sangeetha Alleges Extramarital Affair : अभिनेता आणि TVK पक्षाचे प्रमुख विजय यांचं २७ वर्षांचं लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे.

Actor Vijay Divorce Sangeetha Alleges Extramarital Affair : तमिळ चित्रपटसृष्टीचा 'थलपथी' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आणि TVK पक्षाचा प्रमुख विजय याचं २७ वर्षांचं नातं आता तुटण्याच्या मार्गावर आहे. विजयची पत्नी संगीता स्वर्णलिंगम यांनी जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. यामध्ये त्यांनी पती विजयवर विवाहबाह्य संबंध (Adultery) आणि क्रूर वागणुकीचे (Cruelty) गंभीर आरोप केले आहेत.

अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंधांचा आरोप

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, ४८ वर्षीय संगीता यांनी १९५४ च्या विशेष विवाह कायद्यांतर्गत हा अर्ज दाखल केला आहे. विजयचं (५१) एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचा आरोप संगीता यांनी केला आहे. २०२१ मध्ये आपल्याला विजयच्या या संबंधांबद्दल कळालं. विजयने हे नातं संपवण्याचं वचन दिलं होतं, पण कोणताही पश्चात्ताप न बाळगता त्याने ते सुरूच ठेवलं, असं अर्जात म्हटलं आहे.

सार्वजनिक अपमान आणि परदेश दौरे

संगीता यांच्या अर्जानुसार, विजयने त्यांना आपल्या सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यापासून दूर ठेवलं आहे. "ज्या अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध आहेत, तिच्यासोबतच विजय परदेश दौरे करतो आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. ती अभिनेत्री या दौऱ्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतानाही विजयने त्याला कधीच विरोध केला नाही. यामुळे माझी आणि आमच्या मुलांची सतत समाजात मानहानी झाली आहे," अशी खंत संगीता यांनी व्यक्त केली आहे.

आर्थिक बंधनं आणि मानसिक त्रास

घटस्फोटाच्या अर्जात संगीता यांनी आणखी काही गंभीर मुद्दे मांडले आहेत. पूर्वी मिळणाऱ्या सोयी-सुविधा विजयने काढून घेतल्या आहेत आणि आर्थिक बंधनंही लादली आहेत. २०२४ मध्ये विजयची वागणूक आणि सोशल मीडियावर झालेल्या वादामुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाला. आमचं लग्न आता फक्त कागदावर उरलं आहे. या नात्यातून मला फक्त वेदना, अपमान आणि दुःखच मिळत आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

विशेष विवाह कायद्याच्या कलम 27(1)(a) आणि 27(1)(d) अंतर्गत विवाहबाह्य संबंध आणि क्रूर वागणुकीच्या आधारावर संगीता यांनी घटस्फोटाची मागणी केली आहे. संगीता या एका तमिळ उद्योगपतीची मुलगी असून, त्या विजयच्या मोठ्या फॅन होत्या. या दोघांनी २५ ऑगस्ट १९९९ रोजी हिंदू आणि ख्रिश्चन दोन्ही पद्धतींनी लग्न केलं होतं. या जोडप्याला जेसन संजय आणि दिव्या साशा ही दोन मुलं आहेत.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?