शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमातील अभिनेता रोहुल्लाह मेहदीला अटक

Published : Aug 24, 2026, 08:16 AM IST
शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमातील अभिनेता रोहुल्लाह मेहदीला अटक

सार

शाहिद कपूरच्या 'देवा' सिनेमात दिसलेला अभिनेता रोहुल्लाह मेहदीला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. मीरा-भाईंदरच्या काशिमिरा पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला दहिसर चेकनाक्यावरून २८ ग्रॅम ड्रग्जसह पकडलं.

अभिनेता रोहुल्लाह मेहदीला ड्रग्ज तस्करी प्रकरणात सामील असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २८ ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. मीरा-भाईंदर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहदी ड्रग्ज तस्करीसाठी दहिसर चेकनाक्यावर येणार असल्याची पक्की खबर काशिमिरा पोलिसांना मिळाली होती. यानंतर काशिमिरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी एक टीम तयार करून पाळत ठेवली आणि ही कारवाई केली.

मीरा-भाईंदर पोलिसांनी सांगितले की, "रोहुल्लाह मेहदी आणि त्याच्या साथीदाराला २८ ग्रॅम ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे." पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

कोण आहे रोहुल्लाह मेहदी?

रोहुल्लाह मेहदी हा शाहिद कपूरच्या 'देवा' या सिनेमात दिसला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन रोशन अँड्र्यूज यांनी केलं आहे. सिनेमात शाहिद कपूरसोबत पूजा हेगडे आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शाहिद कपूरने यात एका अशा पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो गुन्हेगारांना पकडण्यासाठी कोणत्याही थराला जातो आणि त्यामुळे त्याच्या करिअरमध्ये अडचणी येतात. हा सिनेमा २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Nisha Raphael POCSO Case: ११ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार? इन्फ्लुएन्सर निशा राफेलवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
Nana Patekar: 'ती भूमिका माझा जीव घेईल', नानांनी आधीच वर्तवली होती का स्वतःच्या मृत्यूची भविष्यवाणी?