गणपतीच्या पूजेवरुन आमिर खान ट्रोल, युजर्स म्हणाले 'हिंदू होण्याचा...'

Published : Sep 09, 2024, 08:23 AM IST
Aamir Khan Ganesh Puja

सार

गणेश चतुर्थीनिमित्त आमिर खानने आपल्या मुलासोबत गणपतीची पूजा केल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. याच फोटोवरुन आमिरला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Aamir Khan Troll on Social Media : बॉलिवूडमध्ये धूमधडाक्यात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. यानिमित्त अभिनेता आमिर खानने बहीणीचा पती संतोष हेगडे यांच्या घरी गणपतीची पूजा केली. यावेळी आमिरचा मुलगा आजाद खानही उपस्थितीत होता. आमिरचे गणपतीची पूजा करताने काही फोटो सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. याच फोटोवरुन आमिरला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.

आमिर खान ट्रोल
आमिर खानने पूजेवेळी निळ्या रंगातील कुर्ता आणि डेनिम जीन्स घातली होती. आमिर गणपतीची मनोभावे पूजा करताना दिसून आला. याशिवाय आजाद खानही पूजा करताना दिसला. यावरुन आमिरला ट्रोल केले जात आहे. एका युजरने म्हटले की, 'कृपया हिंदू बनण्याचे नाटक बंद कर'. दुसऱ्याने म्हटले, ‘तू ही पूजा का करतोय, हे तुझ्या धर्माविरुद्ध आहे.’

आमिरने याआधीही गणपतीची पूजा केली आहे. 7 सप्टेंबरला आमिर खानने अंबानी यांच्या निवासस्थानी गणपतीसाठी पोहोचला होता. यावेळी मुलगा जुनैद खान आणि आजाद खानही आला होता. आमिर प्रत्येक वर्षी आपल्या बहिणीसोबत गणेशोत्सवाचा सण साजरा करतो.

आमिर खानच्या कामाबद्दल थोडक्यात…
आमिर खानची बहीण निखतचे लग्न संतोष हेगडे याच्यासोबत झाले आहे. संतोष हेगडे पुण्यातील फार्मास्युटिकल कंपनीच्या सीईओ पदावरुन सेवानिवृत्त आहे. आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो सितारे जमीवर पर च्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याचे दिग्दर्शन आरएस प्रसन्ना यांच्याकडून केले जात आहे. सिनेमा यंदाच्या वर्षाअखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

अंबानींच्या निवासस्थानी चमकले तारे: सलमान, करीना, हे सेलिब्रिटी गणेशोत्सवात हजर

टेलिव्हिजनवरील या 5 कलाकारांच्या गाजल्यात गणपतीच्या भूमिका

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Imran Khan: इम्रान खानला मुंबईत पोलिसांनी घेतलं ताब्यात, व्हॅनमधून सेल्फी शेअर करत म्हणाला...
अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश