आईसोबत अनैतिक संबंधाचा संशय; मित्रानेच केला मित्राचा खून

Published : May 29, 2025, 03:06 PM ISTUpdated : May 29, 2025, 03:15 PM IST
crime

सार

आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. या प्रकारानंतर मित्राचा मृतदेह शेतात पुरला गेला.

Crime News : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने एका तरुणाने आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खून करून मृतदेह शेतात पुरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

२४ ते २८ मेदरम्यान सौंदणे येथे घडली घटना

या घटनेत नेताजी तानाजी नामदे (वय ३२, रा. सौंदणे) याचा मित्र विकास मारुती गुरव (रा. सौंदणे) याने खून केला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना २४ ते २८ मेदरम्यान घडली असून, मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दळणासाठी गेलेला तरुण परतलाच नाही

नेताजी नामदे २४ मे रोजी गावातील गिरणीत दळण घेऊन गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परत आला नाही. त्यामुळे वडिलांनी मोहोळ पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. गावात शोध घेत असताना एका व्यक्तीने नेताजीला विकास गुरवच्या घरासमोर मोटारसायकलवर पाहिल्याची माहिती दिली.

आईवर वाईट नजर व अनैतिक संबंधाचा संशय

नेताजीने आरोपी विकास गुरव याला व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून, त्याच्यावर आपल्या आईसोबत वाईट संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. यावरून चिडलेल्या विकासने नेताजीचा खून केला, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे.

शेतात पुरलेला मृतदेह सापडला

नेताजीचा मोबाईल बंद आल्याने पोलिसांनी विकासला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने खून केल्याची कबुली दिली व मृतदेह शेतात पुरल्याचे सांगितले. पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे सौंदणे गावासह परिसरात भीतीचे व दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून