कुटुंबाच्या शेतात एका तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. तपासात असे समोर आले आहे की तिचा मृत्यू डुकरांच्या हल्ल्यात झाला नाही.
गुन्हा करताना गुन्हेगारांना नेहमीच असे वाटते की ते कधीही पकडले जाणार नाहीत. परंतु ते कितीही तयारी केली तरी, काहीतरी पुरावा मागे राहतो आणि त्याद्वारे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागतात. रशियातील एका कुटुंबाच्या शेतात डुकरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असे मानल्या जाणाऱ्या १७ वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. गेल्या २३ नोव्हेंबर रोजी मिलेना शेव्हेलियोवा या किशोरवयीन मुलीचा मृतदेह डुकरांनी चावून ठार मारल्याच्या अवस्थेत कुटुंबाच्या शेतात आढळून आला होता.
मिलेनाला डुकरांनी जिवंतपणी चावून ठार मारले असे सुरुवातीला वाटले होते, परंतु नवीन खुलाशाने शेजारी अटक करण्यात आला आहे. द सनच्या वृत्तानुसार, शेजारच्याने मिलेनाला मारहाण करून बेशुद्ध केले आणि नंतर तिला डुकरांना खायला टाकले. ४० वर्षीय शेजारी इगोर सायका याने मिलेनावर हल्ला केला. इगोर सायका हा मिलेनाच्या वडिलांशी नेहमीच भांडत असे आणि त्याच रागातून त्याने मिलेनावर हल्ला केला असे वृत्त आहे.
रशियातील क्रास्नोयार्स्क क्राय येथील कुटुंबाच्या शेतात मिलेनाचा मृतदेह डुकरांनी अर्धा खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला. तपासात असे समोर आले की मिलेनाच्या कुटुंबाशी त्याचे वैर होते आणि तो शेतात आग लावण्यासाठी आत शिरला होता. त्याने पोलिसांना सांगितले की तो शेतातील गुरांना आणि डुकरांना मारण्यासाठी आला होता आणि त्याच वेळी तिथे आलेल्या मिलेनावर त्याने हल्ला केला.
मिलेनावर हल्ला झाला तेव्हा जोरदार बर्फवृष्टी होत होती. शिवाय, मिलेनाचे आई-वडील त्यावेळी घरी नव्हते. इगोर सायकाने पोलिसांना सांगितले की त्याने मिलेनाला दोनदा मारले. मारहाणीत बेशुद्ध झालेल्या मिलेनाला इगोरने शेतातच सोडले. मिलेनाच्या शरीरावर डुकरांनी अनेक वेळा चावल्याचे व्रण होते. सुरुवातीच्या वृत्तांमध्ये असे म्हटले होते की डुकरांच्या हल्ल्यात तिच्या पायाची मुख्य रक्तवाहिनी तुटली आणि रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.