Sambhaji Nagar Crime : महिला कीर्तनकार संगीताताई महाराज यांची आश्रमात दगडाने ठेचून हत्या, जिल्ह्यात खळबळ

Published : Jun 28, 2025, 11:34 AM ISTUpdated : Jun 28, 2025, 01:27 PM IST
Sambhaji Nagar Crime

सार

वेजापूरमधील एका आश्रमातील महिला कीर्तनकार यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून वेगाने आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील वैजापुर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील एका आश्रमात महिला कीर्तनकार ह.ब.प. संगीताताई महाराज यांची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आश्रमात थेट घुसून दगडाने वार करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिस तपास सुरू 

फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोलीस दाखल होताच महिला किर्तनकार यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला आहे. फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ठोस पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून हत्या नेमकी कशामुळे झाली आणि कोणी केली याबद्दल अधिक शोध घेतला जात आहे.

जिल्ह्यात एकच खळबळ महिला कीर्तनकाराची अशा पद्धतीने हत्या होणे हे अतिशय गंभीर व धक्कादायक असून, यामुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही हत्या कोणत्या वैयक्तिक वा सामाजिक कारणावरून झाली याचा तपास लवकरच उलगडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुण्यात दुहेरी हत्येने खळबळ

पुण्यातील तळवडे परिसरात बुधवारी (२५ जून) पहाटे एक धक्कादायक दुहेरी खून घडला आहे. प्रेमसंबंधांमधून निर्माण झालेल्या द्वेषातून एका महिलेने तिच्या दोघांपैकी दुसऱ्या प्रियकरासोबत असताना तिसऱ्या प्रियकराने रागाच्या भरात दोघांचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रकरण काय आहे?

देहूरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला, जगन्नाथ आणि दत्तात्रय हे तळवडे परिसरात राहत होते. मंगला आणि जगन्नाथ हे दोघे मजुरीचे काम करत असत, तर दत्तात्रय मजूर पुरवण्याचे कंत्राट घेत असे.मंगला हिचे जगन्नाथ व दत्तात्रय या दोघांशीही अनैतिक संबंध होते. हे संबंध दत्तात्रयला समजल्यावर तो प्रचंड चिडलेला होता.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून