Pune Junnar St Bus Car Accident : जुन्नरमध्ये एसटी बस-कारच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा, 2 ठार तर 15 जखमी

Published : Jul 07, 2024, 03:12 PM IST
accident

सार

Pune Junnar St Bus Car Accident : जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे. 

Pune Junnar St Bus Car Accident : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये 2 जण ठार झाले असून 15 प्रवासी जखमी आहेत. जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला. या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एसटी बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस व प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. अपघातातील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात झालेली एसटी बस पारनेरवरुन मुंबईकडे तर कार आळेफाट्याकडे जात असताना ओतुरजवळ हा अपघात झाला. बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा आणि ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Worli Heat And Run Accident : वरळीत चारचाकी गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू, चालक फरार

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून