Drugs News : पुण्यात ड्रग्जप्रकरणात मोठी कारवाई, दोन पोलिसांचे निलंबन तर FC रोडवरील बार सील; अनेकजण ताब्यात

Published : Jun 24, 2024, 01:28 PM IST
pune drugs news

सार

Pune Drugs News : पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् एकच खळबळ माजली. 

Pune Drugs News : पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् एकच खळबळ माजली. पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यात विरोधकांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर प्रशासनाकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली. पोलीस दलातील दोन बिट मार्शल यांचे निलंबन करण्यात आले. कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित हॉटेलही सील करण्यात आले आहे.

पुण्यातील लिक्वीड लिजर लाउंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. हॉटेलमधील पाच जणांना उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले. हॉटेलमधील ज्या ठिकाणी परवानगी नव्हती, तिथे सुद्धा मद्य साठा ठेवला होता. त्याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. हॉटेलमधील एका मजल्यावर मद्याचा साठा ठेवण्यात आला होत्या. त्यावर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येथे येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

बार सील करण्यात आला, अनेकांना घेतले ताब्यात

पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी याप्रकरणाची प्रसार माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, शनिवारी रात्री पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या एल ३ नावाचे एक बार आहे. त्यांना दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत तो सुरू ठेवण्यात आला होता. 2 मालकांनी हा बार पुढे 3 जणांना चालवायला दिला होता.

एका इव्हेंट मॅनेजरने 40 ते 50 लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली होती. रात्री १.३० नंतर बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आणि दुसऱ्या गेटने तिथे आत जाण्याची परवानगी दिली. यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. एल ३ बार सील करण्यात आला आहे.

जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे, तो पदार्थ कोणता आहे. हे अमली पदार्थ विरोधी पथक तपास करत आहेत. १८८ कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केले आहे.

आणखी वाचा :

आरक्षणाअभावी मराठा जात संकटात असून मी एकटा पडलोय, 6 तारखेपर्यंत सगळी कामे उरकून घ्या; मनोज जरांगेंचे समाजबांधवांना आवाहन

 

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Mumbai Murder Case : बापानेच लेकीच्या बिर्याणीत विष कालवून केली हत्या, मुंबईतील घटनेने खळबळ
Viral Video: ७ सीटर कारमध्ये १६ जण! दिल्ली पोलिसांना २००० रुपये देऊन सुटल्याचा ड्रायव्हरचा दावा