
Pune News : पुण्यातील विमानगर परिसरात असणाऱ्या खासगी वॉशरुममध्ये 25 वर्षीय तरुण डोकावून पाहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात वॉशरुममध्ये आलेल्या तरुणीने आराओरडा केल्यानंतर कंपनीची कर्मचाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नक्की काय घडले?
अनिल दुकाळे नावाचा व्यक्ती महिलांच्या वॉशरुममध्ये डोकावून पाहत होता. तक्रार केलेल्या तरुणीने सांगितले की, कंपनीच्या वॉशरुममध्ये गेली असता तेथे सफाई कामगार म्हणून काम करत असलेला अनिल दुकाळे वॉशररुममध्ये डोकावुन पाहत होता. यावेळी वॉशरुममधील लाइट्स बंद होते. याचाच फायदा दुकाळे याने घेत तेथे लपून बसला.
वॉशरुममध्ये गेल्यानंतर लाइट्स ऑन केल्यानंतर दुकाळे चोरुन पाहत असल्याचे दिसले. यानंतर तरुणीने आरडाओरडा करत कर्मचाऱ्यांना तेथे जमा केले. या कर्मचाऱ्यांनी दुकाळे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गेल्या तीन-चार महिन्यांपूर्वीच दुकाळे कंपनीत सफाई कामगार म्हणून कामावर रुजू झाला होता. या प्रकरणात दुकाळेच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.