
पन्थीरांकावू: पन्थीरांकावू टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनीच प्रवाशांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवाशांकडून पैसे घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी चक्क स्वतःचा क्यूआर (QR) कोड वापरला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मध्य प्रदेशचा रहिवासी असलेला नवीन सिंग भदोरिया याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने अवघ्या एका महिन्यात तब्बल सात लाख रुपयांचा घोटाळा केला. टोल कंपनीच्या मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. सध्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.