चारित्र्याच्या संशयावरुन प्रेयसीची हत्या, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Published : May 08, 2025, 09:30 AM IST
crime

सार

Nagpur Crime : नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Nagpur Crime : नागपूरमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नक्की काय घडले?

हेमलता किशोर वैद्य असे मृत तरुणीचे नाव आहे. हेमलाताचे आरोपी अक्षय दातेसोबत प्रेससंबंध होते. पण अक्षय वेळोवेळी हेमलताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद ही झाले होते. हेमलता एकांशी सोसायटीमधील पीस रेसिडेन्सी येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती.

मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस अक्षय हेमलता काम करत असणाऱ्या सोसायटीमध्ये गेला. त्यावेळी हेमलता एका व्यक्तीशी बोलत असल्याने अक्षयने पाहिले आणि त्यावरुन वाद घातला. एवढेच नव्हे त्याचवेळी अक्षयने हेमलतावर धारधार वस्तूने हल्ला केला. यामुळे हेमलता जखमी झाली. अशातच पीस रेसिडेन्सीचे बिल्डर अभिषेक केवलरामानी यांनी हेमलताला तातडीने रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात उपचारादरम्यान हेमलताचा मृत्यू झाला. आरोपी अक्षय याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अक्षयला अमरावती येथून ताब्यात घेण्यात आले.

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून