Kolkata Viral Video: कोलकात्यात धक्कादायक घटना! महिलेला मारहाण करत केस धरून ओढलं, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

vivek panmand   | CMS
Published : Oct 27, 2026, 08:01 PM IST
Kolkata Viral Video: कोलकात्यात धक्कादायक घटना! महिलेला मारहाण करत केस धरून ओढलं, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

सार

कोलकात्यातील एका इमारतीमधील धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती महिलेला बेदम मारहाण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिथे सुरक्षारक्षकही उपस्थित होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून, कोलकाता पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एका निवासी इमारतीत एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचं यात दिसत आहे. वादावादीनंतर हा माणूस महिलेला जमिनीवर ढकलतो, तिच्या कानशिलात लगावतो आणि तिचे केस धरून तिला ओढत नेतो, असं या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

हा व्हायरल झालेला व्हिडिओ १० ऑक्टोबर २०२६ चा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारावेळी तिथे एक सुरक्षारक्षकही उभा होता, ही बाब अधिक चिंताजनक आहे.

ऑनलाइन व्हायरल झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, इमारतीच्या लॉबीमध्ये एक पुरुष आणि महिला आधी वाद घालताना दिसतात. बघता बघता या वादाचं रुपांतर हाणामारीत होतं.

तो माणूस महिलेला जोरात ढकलतो, ज्यामुळे ती जमिनीवर पडते. कशीबशी ती पुन्हा उभी राहते आणि त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. पण तो माणूस काही थांबत नाही. तो तिच्या कानशिलात लगावतो आणि तिचे केस पकडून तिला लॉबीच्या बाहेर ओढत नेतो, असा आरोप केला जात आहे.

या संपूर्ण घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

या व्हिडिओत आणखी एक गोष्ट स्पष्ट दिसते, ती म्हणजे इमारतीच्या लॉबीमध्ये असलेला सुरक्षारक्षक. हा सगळा प्रकार घडत असताना तो तिथेच उभा असलेला दिसतो. या व्हिडिओमुळे निवासी संकुलांमधील सुरक्षा व्यवस्था आणि अशा घटना हाताळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्हायरल सीसीटीव्ही व्हिडिओ पाहा

संजय कपूर या सोशल मीडिया युजरने सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी 'एक्स' (X) वर हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर या घटनेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये कोलकाता पोलिसांना या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्याची, संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याची आणि या मारहाणीची चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्यांनी काही राजकीय नेते आणि पोलिसांच्या खात्यांना टॅग करत दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यानंतर मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये कपूर यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला यात लक्ष घालण्याचं आवाहन केलं.

मात्र, या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं किंवा व्हिडिओ संपल्यानंतर तिथे कोणी मदतीला आलं का, हे या उपलब्ध फुटेजवरून स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Ghatkopar Crime: बायकोसोबत भांडण, बापाने ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून फेकलं
Saudi Arabia Arrest: सौदी अरेबियात अनैतिक कृत्य करणाऱ्या दोन परदेशी महिलांना अटक