रिलेशनशिप डेस्क. रागाच्या भरात माणसावर अनेकदा ताबा सुटतो. तो विचार करण्याची शक्ती गमावतो. असेच काहीसे ६७ वर्षीय वृद्धाबरोबर घडले. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणाऱ्या नूएल मॉकने आपला राग मुलीवर आणि जावयावर काढला आणि त्यांना गोळ्या घातल्या. त्यानंतर स्वतःलाही गोळी मारून घेतली. या गोळीबारात जावयाचा मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी आहे.
ही घटना १३ डिसेंबर रोजी गल्फ काउंटी येथील नूएल आणि रोंडा यांच्या घरी घडली. नूएलचा त्याची पत्नी रोंडा मॉक हिच्याशी जोरदार वाद झाला. त्यानंतर रोंडा घाबरून घराबाहेर पळाली. त्यानंतर रागाच्या भरात नूएल बंदूक घेऊन आपली मुलगी जेसिका जॉन्स हिच्या घरी पोहोचला. स्वीटबे परिसरातील तिच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्यानंतर जेसिका आणि तिचा पती जोशुआ यांना गोळ्या घातल्या.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मॉक घराबाहेर हत्यार घेऊन बसला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण मॉकने बोलण्यास नकार देत स्वतःला गोळी मारून घेतली. पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता जोशुआ जॉन्सचा मृत्यू झाला होता आणि जेसिका जॉन्स गंभीर जखमी होती. घटनेच्या वेळी घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेली त्यांची दोन मुले या दुर्दैवी घटनेपासून अनभिज्ञ होती. जेसिकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कौटुंबिक वादात कसे एक घर उद्ध्वस्त होते या घटनेचे हे उदाहरण आहे. कधीही असे वाद झाल्यास समजूतदारपणे काम करावे. रागाला आपल्यावर कधीही हावी होऊ देऊ नये. शांत राहून आपण कोणताही वाद सोडवू शकतो.