दिल्लीत ड्रग्ज जाळ्याचा पर्दाफाश, आरोपीचा काँग्रेससोबत संबंध असल्याची चर्चा

Published : Oct 08, 2024, 10:58 AM IST
drugs

सार

दिल्लीत सर्वाधिक मोठ्या ड्रग्ज जाळ्याचा स्पेशल सेल पोलिसांनी पर्दाफाश केल्याचे वृत्त समोर आले आहे. या धाडीमध्ये 500 किलोग्रॅमपेक्षा अधिक कोकेन जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Delhi Drug Bust : दिल्लीतील स्पेशल सेल पोलिसांनी गेल्या मंगळवारी 2 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक 500 किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे. ड्रग्ज दिल्ली आणि उत्तर भारतापेक्षा सर्वाधिक मोठ्या ड्रग्ज जाळ्याचा खुलासा असल्याचे बोलले जात आहे. जप्त करण्यात आलेले कोकेन दक्षिण अमेरिकेतून मागवण्यात आले होते. या ड्रग्जचा वापर मोठे कॉन्सर्ट्स, सणासुदीच्या काळात पुरवण्याचा प्लॅन करण्यात आला होता. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने दक्षिण दिल्लीतील महिपालपुर येथून चार व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये दिल्लीतील तुषार गोयल, हिंमांशु कुमार आणि औरंगजेब सिद्दीकीसह मुंबईतील स्थानिक कुमार जैन अशी आरोपींची नावे आहेत.

ड्रग्जची किंमत
जप्त करण्यात आलेले ड्रग्ज 500 किलोग्रॅम कोकेनचे असल्याचे सांगितले जात आहे. पण वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये हा आकडा 540-600 किलोग्रॅमपर्यंत असू शकतो असेही म्हटले जात आहे. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, ड्रग्जची किंमत 2 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, एजेंसीच्या अनुमानानुसार, अधिक तपास केला असता 5620 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे ड्रग्ज आहेत.

मुख्य आरोपीचा काँग्रेससोबत संबंध
तुषार गोयल दिल्लीतील आरटीआय सेलचा प्रमुख होता. ड्रग्जचे काँग्रेससोबतचे संबंध समोर आल्यानंतर राजकरण तापले गेले. काँग्रेसने स्पष्टीकरण देण्यास नागरिक ड्रग्जच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा निवडणुकीवेळी वापर केला जातोय का असे प्रश्नही उपस्थितीत करत आहेत. यावरुन भाजपाने देखील हल्लाबोल केला आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार गोयल आहे. गोयल व्यतिरिक्त त्याच्या तीन साथीदारांनी या प्रकरणात वेगवेगळी भूमिका निभावली आहे.

आणखी वाचा : 

नागपूरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर छोट्या बहिणी देखत बलात्कार, संशयिताचा शोध सुरू

पतीने पत्नीवर 72 जणांकडून 92 वेळा केला बलात्कार, स्वत:च पत्नीला देत होता ड्रग्ज

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून