मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या बड्या व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडले, पुण्यात मध्यरात्री थरार

सार

कल्याणी नगर विमाननगर परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल व पब्ज सुरु असतात. एकीकडे रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही.

कल्याणी नगर विमाननगर परिसरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल व पब्ज सुरु असतात. एकीकडे रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे भीषण अपघात घडत आहेत. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत दोघांना घडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. हा भीषण अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आलेले आहे. अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकीवर असलेली मुलगी हवेत उडली. त्यानंतर जमिनीवर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मृत दोघे राजस्थानमधील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम कंपनीच्या मालकाच्या अल्पवयीन मुलाने अत्यंत बेदरकारपणे आलिशान गाडी चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघांना चिरडले. अपघातातील अनिस अवलिया याचा उपचार सुरू असताना तर अश्विनी कोस्ता हिचा जागीच झाला. हे दोघेही राजस्थानमधील होते.

About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Share this article