पोलीस निरीक्षकाकडून तरुणीचा विनयभंग, नंदनवन पोलिसांत गुन्हा दाखल

Published : May 19, 2024, 06:05 PM IST
Molestation

सार

अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपुरात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युपीएससीचा अभ्यास करीत असलेल्या एका 22 वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याचा ठपका पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर ठेवण्यात आलाय. या प्रकरणामुळे अकोला पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकाराने पुन्हा एकदा अकोला पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली आहे.

विनयभंगाचा गुन्हा दाखल

हाती आलेल्या प्रथमिक माहितीनुसार, नागपुरातील नंदनवन भागात राहणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी ही युवती यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होती. दरम्यान, या ओळखीतून धनंजय सायरे यांनी या युवतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिल्यावर छेड काढत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध भादवि कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून