टिप्परने धडक दिल्याने छोटा हत्तीमधून नोटांचे बंडल पडले रस्त्यावर, पोलिसांनी 7 कोटी केले जप्त

Published : May 11, 2024, 05:16 PM IST
andhra pradesh

सार

आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

हैदराबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. त्यातच आता आंध्र प्रदेशातही 7 कोटी रुपयांची रोकड पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. कारण, शुक्रवारीच एनटीआर जिल्ह्यात 8 कोटी रुपये पोलिसांकडून जप्त करण्यात आले होते. राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये लपवून 7 कोटी रुपये नेण्यात येत होते. टाटा एस या छोटा हत्ती वाहनातून ही रक्कम नेली जात होती. मात्र, नल्लाजर्ला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रॅक्टर ट्रॉलीसोबत छोटा हत्तीची धडक झाली. या धडकेमुळे छोटा हत्तीमधून नेण्यात येत असलेले बॉक्स खाली पडले मात्र ह्या बॉक्समधून नोटांचे बंडलच रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं. 

छोटा हत्ती वाहन ठेवण्यात आलेल्या पोत्यांमध्ये काही पुठ्ठयांचे बॉक्स होते, ज्यामध्ये रोकड ठेवण्यात आली होती. मात्र, दोन वाहनांची धडक झाल्यानंतर बॉक्समधील रक्कम रस्त्यावर पडल्याचा पाहताच स्थानिकांनी तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली. विजयवाडा येथून हे वाहन विशाखापट्टणमकडे जात असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातात छोटा हत्ती वाहनातील चालक जखमी झाला असून त्यास गोपालपूरम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

25 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान

आंध्र प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत आहे. राज्यातील 25 लोकसभा मतदारसंघात 13 मे ला नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे निवडणूक अधिकारी व प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

US : STI च्या वादावरुन अमेरिकन विद्यार्थ्याकडून प्रेयसीवर चाकू हल्ला, हत्येप्रकरणी ठरला दोषी
गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून