नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या उत्तर महाराष्ट्र केसरीची गोळ्या झाडून हत्या

Published : May 10, 2024, 08:03 PM IST
crime 2.jpg

सार

नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुण खून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नाशिक : नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुण खून करण्यात आला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी भूषण लहामागेवर गोळ्या झाडल्या असून या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या भूषण लहामागेचा जागीच मृत्यू झाला. यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भूषण लहामागेची वैमनस्यातून हत्या

नाशिक-मुंबई महामार्गावर भर दिवसा या हत्येचा थरार रंगला होता. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून आले. पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत भूषणचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. भूषणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पूर्व वैमनस्यातून भूषण लहामागेची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal
Pune Ketan Case । केतन अग्रवालला श्रद्धांजली देण्यासाठी शांतता मोर्चा