लखनौमध्ये कारने स्कूटरला धडक दिली, किमी अंतरापर्यंत फरफटत नेले

लखनौमध्ये स्कूटर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. कारचालकाने स्कूटरला किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होतात. पण यावेळी एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अपघात झाल्यावर लगेच वाहन थांबवायला हवे. पण काही लोक चूक केल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी आणखी चूक करतात आणि स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही धोक्यात आणतात. बेजबाबदारपणे वाहन चालवून दुसऱ्या वाहनांना धडकणे हे चूक आहे, त्यापेक्षाही मोठी चूक म्हणजे अपघातानंतर वाहन न थांबवता पळून जाणे. अशा लोकांमुळे अनेक निष्पाप लोक आपले जीव गमावतात. तसेच इथे एका कार आणि स्कूटरमध्ये धडक झाली आणि अपघातानंतर कारचालकाने वाहन न थांबवता कारच्या पुढे अडकलेल्या स्कूटरला किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कारचालकाच्या बेजबाबदारपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये ही घटना घडली. या घटनेत दोन तरुणांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. वेगात येणाऱ्या कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली आणि नंतर किलोमीटर अंतरापर्यंत स्कूटरला फरफटत नेले. लखनौच्या किसान पथवर ही घटना घडली. तिथे असलेल्या काही लोकांनी दुसऱ्या वाहनाने कारचा पाठलाग केला आणि ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाईकवरून कारचा पाठलाग करणारे लोक कारचालकाला वाहन थांबवण्यासाठी अनेक वेळा हातवारे करत होते, पण किलोमीटर अंतरापर्यंत कारचालकाने कार थांबवली नाही. कारच्या पुढच्या भागात स्कूटर अडकल्यामुळे रस्त्यावर घर्षण होत होते आणि ठिणग्या उडत होत्या, हे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कारचालकाविरुद्ध नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतरही वाहन न थांबवता पुढे जाणारा कारचालक तरुण नव्हता हे विशेष. असे वाहन न थांबवता चालवणारा व्यक्ती ७० वर्षांचा चंद्रप्रकाश तिवारी असल्याचे ओळखण्यात आले आहे. ते प्रयागराजचे रहिवासी असून चिन्हाटकडे जात असताना त्यांची कार स्कूटरला धडकली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लाल रंगाची हुंडई i20 कार स्कूटरला फरफटत नेताना दिसत आहे. स्कूटर कारच्या बोनटखाली अडकले आहे आणि कारच्या वेगाने ठिणग्या उडताना दिसत आहेत. या व्हिडिओवर लखनौ पोलिसांनी प्रतिक्रिया दिली असून चालकाला अटक करण्यात आली आहे. अपघातास कारणीभूत ठरलेली दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणांची ओळख आमीर आणि रेहान अशी झाली असून ते आयशबागहून मोहनलालगंजकडे जात असताना ही घटना घडली.

 

Share this article