Vasai Crime : वाढदिवसाच्या पार्टीतून बोलावून तरुणाची निर्घृण हत्या; मित्रही जखमी

Published : Jun 24, 2025, 11:13 AM ISTUpdated : Jun 24, 2025, 11:16 AM IST
murder

सार

पालघरमध्ये एका 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, वाढदिवसाच्या पार्टीवेळी हा सर्व प्रकार घडला असून यामध्ये एकजण जखमी देखील झाला आहे.

Crime News : पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान घडलेली एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर थोड्याच वेळात एक ३० वर्षीय तरुण खून झाल्याची घटना वसईच्या उमेलमान फाटा भागात घडली. मृत युवकाचे नाव आकाश पवार (वय ३०) असून, आरोपी मनीष पांडे (वय ३७) याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आकाश आणि त्याचे मित्र एमआयडीसी मैदानात एका भंगार दुकानाजवळ पार्टी करत होते. यावेळी आरोपी मनीष पांडे तिथे आला आणि आकाशला पार्टीमधून बाहेर बोलावले. बाहेर गेल्यानंतर त्याने आकाशवर धारदार चाकूने सपासप वार केले. हल्ला इतका भयंकर होता की आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

ही घटना पाहून पार्टीतील राहुल भुरकुंड नावाचा मित्र भांडण सोडवण्यासाठी पुढे गेला. त्याच्यावरही आरोपीने चाकूने हल्ला केला आणि तो गंभीर जखमी झाला. आकाशने प्रतिहल्ला करत असताना आरोपी मनीषही जखमी झाल्याचे सांगण्यात येते.या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनीष पांडे हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

3 वर्षांच अफेअर, नोकरी आणि हत्या

वसईमध्ये राहणाऱ्या आरती यादवचे रोहित यादवसोबत अफेअर होते. आरोपी रोहितने वसईतील गावराईपाडा परिसरात आरतीला नोकरीला लावले. पण आरतीचे नोकरीच्या ठिकाणी दुसरे अफेअर सुरू असल्याचा संशय रोहितला आला होता. यामुळेच दोघांमध्ये वाद सुरू होते. अशातच आरतीने रोहितच्या वागण्याला कंटाळून त्याच्यासोबत ब्रेकअप केले. अशातच संतप्त झालेल्या रोहितने आरतीची हत्या केली. आरती ही उत्तर प्रदेशात राहणारी होती. तर आरोपी रोहित हा हरियाणामधील राहणारा आहे. सदर घटना जून महिन्यातच घडली आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hyderabad Crime : रियल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)
Gujarat Crime : लज्जास्पद! 6 वर्षीय मुलीसोबत निर्भयासारखा अत्याचार, गुप्तांगात घातला रॉड