Budget 2025 10 Big Announcement : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अर्थमंत्र्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. जाणून घेऊया अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणांबद्दल सविस्तर…
Budget 2025 10 Big Announcement : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) संसदेत आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी काही मोठ्या घोषणा अर्थसंकल्पातून केल्या आहेत. सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ते तरुणांना स्वस्त कर्ज अशा काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. जाणून घेऊया अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणांबद्दल सविस्तर...
आसाममध्ये युरिया प्लांट
आसाममध्ये यूरिया प्लांटची स्थापना केली जाणार आहे. या प्लांटची 12.7 लाख मेट्रिक टनची वार्षिक क्षमता असणार आहे. याशिवाय पूर्व क्षेत्रात तीन निष्क्रिय यूरिया प्लांट पुन्हा सुरु केले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे यूराची पुर्तता वाढण्यास मदत होणार आहे.
वैद्यकिय महाविद्यालयात वाढवणार जागा
सरकारने आयआटी पटनाच्या विस्ताराबद्दल घोषणा केली आहे. इतर पाच आयआयटीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आयआयटीमध्ये 6500 आणि वैद्यकीय कॉलेजमध्ये 75000 जागा वाढवण्याची घोषणा केली आहे.
प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना
अर्थसंकल्पात प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचेही घोषणा करण्यात आली आहे. ही योजना 100 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. यामध्ये 1.7 कोटी शेतकऱ्यांचा समावेश करण्याची योजना आहे. शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि आपत्कालीन कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विमानतळाच्या माध्यमातून जोडली जाणार लहान विमानतळे
अर्थसंकल्पात केंद्र सरकारने देशातील लहान शहांमधील 88 विमानतळे जोडण्याची योजना जाहीर केली आहे. याशिवाय पटना विमानतळाचा विस्तार केला जाणार आहे. बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
तरुणांना मिळणार स्वस्त कर्ज
सरकराने स्टार्टअपचे बजेट वाढवले आहे. तरुणांसाठी स्वस्त कर्जाची घोषणा करण्यात आली आहे. देशात खेळण्यांचे ग्लोबल हब तयार केले जाईल. यामध्ये पर्यावरणाला हानी पोहचणार नाही अशा खेळण्यांची निर्मिती केली जाणार आहे.
स्टार्टअपला 20 कोटींपर्यंतचे कर्ज
अर्थसंकल्पात एमएसएमईसंबंधित (MMSME) घोषणा करण्यात आली आहे. सरकारकडून या सेक्टरसाठी कार्ड जारी केले जाईल. सरकारने कर्जाची मर्यादा 5 कोटींहून 10 कोटी रुपये केली आहे. तर स्टार्टअपसाठी कर्ज 10 लाखांहून 20 कोटी करण्याचा निर्णय घेतला आहे.
परमाणू उर्जेवर लक्ष
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की, परमाणू उर्जा अनुसंधान आणि विकास मिशनअंतर्गत 5 स्वदेशी रुपात विकसित लहान मॉड्यूलर परमाणू रिअॅक्टर 2033 पर्यंत सुरू होतील.
वैद्यकिय व्हिसाचे नियम
केंद्र सरकार पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. राज्यांच्या मदतीने 50 पर्यटन स्थळांवर विकास केला जाील. याशिवाय मेडिकल टूरिज्मसाठी व्हिसाही दिला जाणार आहे. यासोबत व्हिसाचे नियम सोपे केले जाणार आहेत.
एक लाख घरांचे बांधकाम
केंद्र सरकारने जल जीवन मिशनला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर पीएम आवास योजनेअंतर्गत 1 लाख घरांचे बांधकाम केले जाणार आहे.
नवे इन्कम टॅक्स विधेयक येणार
पुढील आठवड्यात संसदेत नवे इन्कम टॅक्स विधेयक मांडले जाणार आहे. कॅन्सरला मात देण्याच्या उद्देशाने सरकारने डे केअर कॅन्सर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बीमा क्षेत्रात सरकारने एफडीआयची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत केली आहे.
आणखी वाचा :
New Tax Regime नुसार कोणाला किती कर भरावा लागणार? घ्या जाणून
Budget 2025 वरुन सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर मिम्सचा पाऊस