अमेरिकन गुप्तचर संस्था CIA चे एजंट जगभर आहेत. हे गुप्त माहिती गोळा करणे आणि गुप्त ऑपरेशनसारखी कामे करतात. व्यापक जागतिक नेटवर्क आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे ती शक्तिशाली बनते.
FSB आणि SVR रशियाच्या प्रमुख गुप्तचर संस्था आहेत. FSB अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तर SVR चे काम दुसऱ्या देशात गुप्त माहिती गोळा करणे आणि ऑपरेशन करणे आहे.
UK ची गुप्तचर संस्था MI6 गुप्त माहिती गोळा करण्यात आणि दहशतवाद विरोधी प्रकरणांमध्ये तज्ज्ञ आहे. दुसऱ्या महायुद्ध आणि शीतयुद्धादरम्यान यांनी मोठी भूमिका बजावली होती.
MSS ही चीनची गुप्तचर संस्था आहे. ही काउंटर इंटेलिजन्स, विदेशी हेरगिरी आणि देशांतर्गत सुरक्षेची कामे पाहते. ही अत्यंत गोपनीय संस्था आहे. जगाला याबद्दल फारच कमी माहिती आहे.
मोसादला जगातील सर्वात धोकादायक गुप्तचर संस्था मानले जाते. ही जगभर गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवाद विरोधी आणि गुप्त मोहिमांसाठी जबाबदार आहे.
DGSE फ्रान्सच्या विदेशी गुप्तचर, काउंटर इंटेलिजन्स ऑपरेशन सांभाळते. आफ्रिका, मध्य पूर्वेत तिची मजबूत उपस्थिती आहे. दहशतवाद, सायबर गुप्तचर आणि गुप्त लष्करी मोहिमांमध्ये तज्ज्ञ आहे.
RAW ही भारताची विदेशी गुप्तचर संस्था आहे. तिची स्थापना १९६८ मध्ये झाली होती. ही दहशतवाद निरोध, शेजारी देशांबद्दल गुप्त माहिती गोळा करणे आणि सायबर हेरगिरीसारखी कामे पाहते.
BND ही जर्मनीची विदेशी गुप्तचर संस्था आहे. ही दहशतवाद, आंतरराष्ट्रीय हेरगिरी आणि सायबर धोक्यांवर लक्ष केंद्रित करते. ही युरोपीय आणि नाटो सहकाऱ्यांसोबत मिळून काम करते.
ISI ही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आहे. ही भारताविरुद्ध दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. दहशतवादी संघटनांशी तिचे थेट संबंध आहेत.
MIT ही तुर्कीची गुप्तचर संस्था आहे. ही दहशतवाद, सायबर गुप्तचर आणि प्रादेशिक हेरगिरीवर लक्ष केंद्रित करते. ही मध्य पूर्वेत सक्रिय राहिली आहे.