अठराव्या वर्षी डी गुकेश या बुद्धिबळपट्टूने इतिहास रचला आहे. गुकेश आता बुद्धिबळाचा बादशहा ठरला असून त्यानं चीनच्या डिंग लिरेनला हरवलं आहे.
डी गुकेशचं पूर्ण नाव गुकेश दोम्मराजू आहे. गुकेशचा जन्म २९ मे २००६ मध्ये चेन्नईत झाला. त्याच्या वडिलांचे नाव रजनीकांत असून ते पेशाने डॉक्टर आहेत.
गुकेश आणि विशवनाथन आनंद हे दोघेही एकाच शाळेचे विद्यार्थी आहेत. गुकेशने चौथीनंतर शाळा सोडून पूर्ण फोकस हा बुद्धिबळावर दिला होता.
गुकेशचे वडील पेशाने इएनटी सर्जन असून ते त्याच्यासोबत बुद्धिबळ खेळायला जाताना कायम सोबत असायचे. यावेळी त्यांच्या करिअरवर परिणाम झाला पण त्यांनी मुलासाठी सर्वकाही दिलं.
गुकेश हा २०१९ पर्यंत सर्वात तरुण ग्रँडमास्टर होता. विश्वविजेतेपद जाहीर झाल्यानंतर गुकेशला अश्रू अनावर झाले होते, त्यावेळीच व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.