Marathi

आपण स्वतःला कोणत्या आर्थिक सवयी लावून घ्यायला हव्यात, माहिती घ्या

Marathi

‘कमाईपेक्षा थोडा कमी खर्च’ – ही सवय लावा

पगार कितीही असो, जर खर्च त्याहून जास्त असेल तर शिल्लक काहीच राहत नाही. त्यामुळे नेहमी कमाईपेक्षा कमी खर्च करणं ही आदर्श सवय मानली जाते.

Image credits: Freepik@illust_unicorn
Marathi

बचतीला प्राथमिकता द्या – ‘पैसे वाचवणं ही सवय नाही, गरज आहे!’

दर महिन्याच्या सुरुवातीलाच किमान २०-३०% उत्पन्न बचत खात्यात टाका. उरलेले पैसे खर्चासाठी वापरा – यालाच “Pay Yourself First” असं म्हणतात.

Image credits: Meta AI
Marathi

बजेट बनवा आणि त्याचं काटेकोर पालन करा

महिन्याचा खर्च कागदावर उतरवा. त्यानुसार खर्च ठरवा. बजेटमुळे गैरखर्च टळतात आणि वित्तीय अनुशासन जपलं जातं.

Image credits: freepik@pvproductions
Marathi

कर्ज टाळा आणि घेतलं तर वेळेवर फेडा

क्रेडिट कार्डवर अवाजवी खर्च, वेगवेगळ्या कर्जांच्या हप्त्यांमध्ये अडकणं टाळा. एकाच वेळी जास्त कर्जं घेणं तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करू शकतं.

Image credits: freepik@creativaimages
Marathi

गुंतवणुकीच्या सवयी लावा

एफडी, म्युच्युअल फंड, पीपीएफ, किंवा स्टॉक्स – धोका समजून गुंतवणूक करा. महागाईच्या तुलनेत वाढणाऱ्या संपत्तीतच भविष्य आहे.

Image credits: Getty
Marathi

आर्थिक शिक्षण घ्या आणि स्वतःचं फायनान्स समजून घ्या

'पैसे कमवणं महत्त्वाचं आहे, पण ते टिकवणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे.' त्यामुळे बेसिक फायनान्स, टॅक्स प्लॅनिंग, SIP, इन्शुरन्स याबद्दल स्वतःला अपडेट ठेवा.

Image credits: Freepik@ImageSeller
Marathi

आपत्कालीन निधी तयार ठेवा

तातडीच्या गरजा, आजारपण, नोकरीतील बदल – यासाठी किमान ३ ते ६ महिन्यांचा खर्च वाचवून ठेवा. ही सवय भविष्यात अडचणीच्या वेळी कामाला येते.

Image credits: Freepik@vladislavgrohin

चेहऱ्यावरील सुरकुत्या नैसर्गिकपणे कमी करण्यासाठी 5 सर्वोत्तम तेल, तुमचे वयही कमी दिसेल

लेमन वॉटर की कोकनट वॉटर, वजन कमी करण्यासाठी कोणते उत्तम? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

तुम्ही उन्हाळ्यातही खजूर खाता? जाणून घ्या फायदे आणि तोटे, या शारीरिक समस्या उद्भवू शकतात

जुना स्मार्टफोन खरेदी करताना लक्षात ठेवा 5 टिप्स