तुपातील आरोग्यदायी चरबी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण ते योग्य प्रकारे कसे वापरावे हे तुम्हाला माहिती आहे का?
तूप लोण्यापासून बनवले जाते. त्यामुळे ते पुन्हा गरम करून खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.
तुपामध्ये अँटिऑक्सिडंट्स, आरोग्यदायी फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे ते जास्त गरम केल्यास त्याची गुणवत्ता कमी होते आणि आरोग्यावरही परिणाम होतो.
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी एका ग्लास दुधात १ चमचा तूप घालून प्या. सायनसची समस्या असलेल्यांनी दररोज रात्री झोपण्यापूर्वी नाकात २ थेंब तूप टाकावे.
डाळ, चपाती यांसारख्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात तूप घालता येते. डाळ वाढताना तूप घाला, चपाती तयार झाल्यावर तूप थोडे गरम करून लावा.
तुपामध्ये जीवनसत्त्व ई, डी, ए, के असतात. त्यामुळे दररोज २०-३० ग्रॅम तूप खाल्ल्याने आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पण जास्त प्रमाणात खाऊ नका.
विमानाच्या खिडक्या गोलच का असतात?
Gold Rate Surge आज मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ, जाणून घ्या मुंबईसह या शहरांमधील दर
आज मंगळवारी सकाळी नाश्ट्यात बनवा डोसा, हे ५ प्रकारचे डोसे बनवायला आहेत सोपे
आज मंगळवारी जिममधून आल्यावर बनवा हेल्दी Smoothies, हेल्थ बनेल वेल्थ