आपण जीन्सचा वापर जाड असल्यामुळे करणं टाळत असाल तर थांबा, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.
आपण जाडी लपवण्याचा विचार करत असाल तर बॉडीच्या शेपनुसार कपडे घालण्याचा प्रयत्न करा. बाजारापासून ते ओन्लाईनपर्यंत या प्रकारचे कपडे ५०० रुपयांपर्यंत तुम्हाला मिळून जातील.
महिलांची तब्येत जास्त असल्यास त्यांना डार्क रंगाची जीन्स घालण्याचा सल्ला दिला जातो. या रंगामुळे माणूस जास्त जाड दिसून येत नाही.
आपण शॉर्ट टॉपच्या ऐवजी ओव्हर साईज किंवा टी शर्ट घालण्याचा प्रयत्न करू शकता. यामुळे आपण सुंदर आणि स्टाईलिश दिसू शकता.
आपण हाई वेस्ट जीन्स घालणार असाल तर त्यावर जॅकेट, कोर्ट किंवा ब्लेझर घालण्याचा पर्याय उपलब्ध आहे, त्यामुळे आपली जाडी दिसून येणार नाही.
अशा महिलांनी शॉर्ट टॉप घालणं पूर्णपणे बंद करायला हवं. या महिलांनी शर्ट किंवा लूज टीशर्ट घालण्याचा प्रयत्न करावा.
आपण जाड असाल तर मोठ्या खिशाच्या पँट घालू नका, त्यामुळे आपल्या लूकवर परिणाम होतो.