टाकीतून पाणी पूर्णपणे खाली सोडून द्यावे आणि नंतर त्याला ब्रशने घासून काढावे. यासाठी बेकिंग सोडा किंवा डिटर्जंटचा वापर करता येऊ शकतो.
प्रेशर वॉशरने टाकीच्या भिंतीवर आणि खालच्या भागावर पाणी मारावे, त्यामुळे त्याच्यातील घाण निघून जायला मदत होते.
आपण टाकी धुण्यासाठी हायड्रोजन परोकसाईडचा वापर केल्यास टाकी चांगली धुवून निघते आणि तिचा वास येत नाही.
व्हॅक्युम क्लिनरचा वापर केल्यावर टाकी चांगल्या प्रकारे धुवून निघते. आपण अशा प्रकारे टाकीला चांगल्या प्रकारे साफ करू शकता.
क्लोरीन ब्लिचचा वापर करून टाकी धुवून काढता येऊ शकते. त्यामुळे टाकीतून येणारा वास पूर्णपणे थांबतो. हे औषध २ तास टाकीत टाकावे आणि नंतर धुवून टाकावे.