या रोपाला जाड आणि रसरशीत पानांच्या सुंदर माळा येतात. बर्पो टेल हँगिंग पॉटमध्ये खूपच आकर्षक दिसतं. कमी पाणी आणि हलक्या उन्हातही हे रोप झपाट्याने वाढतं.
जाड, चमकदार पानांमुळे जेड प्लांट खूप सुंदर दिसतं. हे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतं असं मानलं जातं. याला आठवड्यातून एकदा पाणी दिलं तरी पुरेसं आहे.
या सक्युलेंटचा आकार गुलाबाच्या पाकळ्यांसारखा गोल असतो, त्यामुळे ते खूपच सुंदर दिसतं. हे रोप कमी पाण्यातही चांगलं वाढतं. हलकं ऊन आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती याला मानवते.