उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी लस्सी हा सर्वोत्तम पर्याय आहे. कमी साहित्य आणि कमी वेळात लस्सी घरीच तयार करता येते. आपण त्याची रेसिपी जाणून घेऊयात.
दही (थंड), साखर (आवडीनुसार), थोडं पाणी वेलची पूड / भाजलेलं जिरं (ऐच्छिक)
फेटलेल्या दह्यात साखर आणि थोडं पाणी घाला. मिक्सरमध्ये किंवा रवीने नीट फिरवा. वरून वेलची पूड घाला.
दह्यात मीठ आणि थोडंसं भाजलेलं जिरं घाला. थोडं पाणी मिसळून नीट फेटा. ही लस्सी पचनासाठी खूप फायदेशीर असते.
लस्सी बनवल्यानंतर 10–15 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा किंवा थोडे बर्फाचे तुकडे घाला.
लस्सी शरीर थंड ठेवते, पचन सुधारते, डिहायड्रेशनपासून बचाव करते, उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवते
उन्हाळ्यात रोज एक ग्लास घरची लस्सी प्यायल्यास आरोग्य आणि चव दोन्हीचा आनंद घेता येतो. बाजारातील पेयांपेक्षा घरची लस्सी अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे.
स्लिव्हलेस ब्लाउजचे डिझाईन पाहून पडाल प्रेमात, लग्नासाठी खास डिझाईन
हे कानातले घातल्यावर चेहरा दिसेल मोठा, ६ युनिक डिझाईनची करा निवड
Mehndi Designs for Ramadan : 10 रुपयाच्या मेहंदी कोनने पायावर काढा या मिनी फूट मेहंदी डिझाइन्स
गोल्ड चेन लॉकेट डिझाइन: एका दगडात दोन पक्षी, चेन मंगळसूत्र लॉकेट