Marathi

उपवासाची साबुदाणा खिचडी घरच्या घरी कशी बनवावी?

Marathi

साहित्य

१ कप साबुदाणा, १/२ कप शेंगदाण्याचा कूट, २-३ हिरव्या मिरच्या, २ मध्यम आकाराचे बटाटे, २ टेबलस्पून तूप, सेंधा मीठ चवीनुसार, थोडी साखर, कोथिंबीर सजावटीसाठी

Image credits: AI
Marathi

साबुदाणा भिजवणे

साबुदाणा नीट धुऊन ५-६ तास किंवा रात्रीभर पाण्यात भिजत ठेवा. पाणी फक्त साबुदाण्याच्या वरच्या पातळीपर्यंतच असावं.

Image credits: AI
Marathi

तडका देणे

कढईत तूप गरम करून हिरव्या मिरच्या परता. नंतर बटाटे टाकून ते मऊ होईपर्यंत शिजवा.

Image credits: AI
Marathi

साबुदाणा आणि मसाला

भिजवलेला साबुदाणा, सेंधा मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घाला. हलक्या हाताने मिक्स करा जेणेकरून दाणे मोडणार नाहीत.

Image credits: AI
Marathi

वाफवणे

झाकण ठेवून मंद आचेवर २-३ मिनिटं वाफवून घ्या. साबुदाण्याचे दाणे पारदर्शक दिसू लागले की खिचडी तयार आहे.

Image credits: AI
Marathi

सजावट आणि सर्व्हिंग

वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम सर्व्ह करा. चवीसाठी लिंबाचा रसही घालू शकता. 

Image credits: AI
Marathi

घरचा शेफ

साबुदाना खिचडीसाठी साबुदाना भीजत टाकताना त्यात जास्त पाणी घालू नका. साबुदाना असेल तेवढेच पाणी घाला. साबुदाना छान भिजतो.

Image credits: Pinterest
Marathi

घरचा शेफ

साबुदाना खिडची कढईत बनवा. इतर भाड्यांमध्ये बनवू नका. तसेच गॅसवर वाफवताना जास्त हलवू नका. नाहीतर साबुदाना विस्कळीत होतो. तसेच हलवताना हळूवार हलवा. नाहीतर फुटतोही.

Image credits: Pinterest
Marathi

घरचा शेफ

साबुदाना खिचडी सर्व्ह करताना सोबत साखर किंवा गुळ घातलेले दही खायला द्या. त्यामुळे खिचडीची चव आणखी छान लागते. तसेच तुम्ही घाईत खात असाल तर खिचडी घशात अडकत नाही.

Image credits: Pinterest
Marathi

घरचा शेफ

साबुदाना खिचडी केवळ उपवासाला खावी असे काही नाही. तुम्ही इतर दिवसही तिचा आस्वाद घेऊ शकता. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये तर ठेल्यांवरही खिचडी मिळते.

Image credits: Pinterest
Marathi

घरचा शेफ

साबुदाना खिचडी खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका. नाहीतर पोट अगदी गच्च झाल्यासारखे होते. जरा वेळा जाऊ द्या. त्यानंतर थोडे आणि त्यानंतर जरा जास्त पाणी प्या. पोटाचा त्रास होणार नाही.

Image credits: Pinterest
Marathi

साबुदाना वडा

अनेकदा साबुदाना खिचडी खाऊन कंटाळा आला तर तुम्ही घरच्या घरी साबुदाना वडाही करु शकता. दही किंवा इतर चटणीसोबत तो बेस्ट लागतो.

Image credits: Pinterest
Marathi

ऑईल करा कमी

साबुदाना वडा तयार केल्यानंतर तो बटर पेपर किंवा पेपर नॅपकीनवर ठेवा. त्यामुळे त्यातील तेल शोषले जाते. असे वडे खायलाही रुचकर लागतात.

Image credits: Pinterest

आज सायंकाळी चहासोबत तयार करा खमंग, कुरकुरीत कांदा भजी!

महिन्याभरात करा 20 हजारांची बचत, वापरा या 10 सोप्या ट्रिक्स

Bail Pola 2025 : आज बैलपोळा, घरच्या घरी तयार करा चविष्ट मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी

BSE Top Gainers Aug 18 : आज सोमवारचे शेअर बाजारातील टॉप गेनर्स, या शेअर्सनी छापले पैसे