गरमागरम कांदा भजीचा आनंद घ्या. ही सोपी रेसिपी येथे आहे.
कांदा, बेसन १ कप, तांदळाचे पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ, बेकिंग सोडा आणि खायचे तेल.
कांदे पातळ स्लाईसमध्ये कापा. जाड कापल्यास ते व्यवस्थित शिजणार नाहीत. कांदे कापताना बोट कापले जाणार नाही याची काळजी घ्या.
बेसन, तांदळाचे पीठ, तीळ, हिंग, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर नीट मिसळा. हाताने ते एकमेकात मिसळा.
पीठात कांदे, मीठ, बेकिंग सोडा घालून थोडे थोडे पाणी टाका. पाणी जपून टाका. मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळही होऊ देऊ नका.
गरम तेलात भजीचे गोळे एकामागे एक टाका. यावेळी तेल उडणार नाही याची काळजी घ्या. भजीचे गोळे सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
गरमागरम भजी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा. भजी खाल्लावर गरमागरम चहा घ्या. दिवस मार्गी लागल्यासारखे वाटेल. दिवसभराचा थकवा क्षणात दूर होईल.
महिन्याभरात करा 20 हजारांची बचत, वापरा या 10 सोप्या ट्रिक्स
Bail Pola 2025 : आज बैलपोळा, घरच्या घरी तयार करा चविष्ट मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली पुरणपोळी
BSE Top Gainers Aug 18 : आज सोमवारचे शेअर बाजारातील टॉप गेनर्स, या शेअर्सनी छापले पैसे
आजपासून नवीन UPI नियम लागू, तुम्हाला 'हे' नियम माहित असायला हवेत