सध्या ऑनलाइन फसवणूक होत असल्याची दररोज प्रकरणे समोर येतात. यामुळे आयुष्यभराची कमाई गमावली जाते.
तुमच्यासोबत ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास याची तक्रार करू शकता.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास लगेच 1930 वर संपर्क करा आणि cybercrime.gov.in वर देखील तक्रार करू शकता.
बँक खात्यासंदर्भात फसवणूक झाल्यास लगेच बँकेला संपर्क करा.
स्थानिक पोलीस स्थानकात ऑनलाइन फसवणूकीसाठी एफआयआर दाखल करा.
अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. याशिवाय कोणालाही आपला ओटीपी, पिन किंवा पासवर्ड सांगू नका.