प्रत्येक व्यक्तीने आपली कमाई आणि खर्चामध्ये संतुलन राखणे फार महत्वाचे आहे. यामुळे भविष्यातील काही गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.
पर्सनल फायनान्सची सुरुवात आपल्या कमाई आणि खर्चाबद्दल समजून घेण्यापासून होते. यामुळे महिन्याभराच्या कमाईची संपूर्ण माहिती असावी.
महिन्याभराच्या कमाईबद्दल कळल्यानंतर सर्व खर्चाची एक यादी तयार करा. यामध्ये घरभाडे, वीजेचे बिल, खाण्यापिण्याचा खर्च अशा सर्व गोष्टींचा समावेश करा.
एक उत्तम पर्सनल फायनान्स प्लॅनसाठी बजेट तयार करणे महत्वाचे आहे. यासाठी 50-30-20 च्या नियमाचे पालन करा.
महिन्याभराच्या पगारातील 50 टक्के कमाई आपल्या दैनंदिन गरजा जसे की, घरभाडे, किराणा अशा काही गोष्टींसाठी खर्च करावी.
30 टक्के कमाईमधील खर्च मनोरंजन किंवा प्रवासासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी करावा.
20 टक्के कमाईमधील पैसे बचत आणि गुंतवणूकीसाठी वेगळे ठेवा.
IBPS SO Prelims Result 2024: SO प्रिलिम्सचा निकाल झाला जाहीर
सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर
Wipro Bonus Shares: १५ वर्षात १०,००० रुपयांचे झाले ५ लाख रुपये
JEE Advaced 2025 : हे आहेत नवीन नियम आणि आवश्यक पात्रता