उन्हाळा म्हणजे आंब्याचा सिझन. आंबा दिसला की आपण तो लगेच विकत घेतो. कितीही पैसे मोजायला तयार असतो. पण याच संधीचा फायदा घेत व्यापारी फसवणूक करतात, त्यामुळे सावध रहा.
Utility News Apr 01 2026
Author: Marathi Desk 1 Image Credits:Getty
Marathi
घरीच करा या 5 सोप्या टेस्ट
बाजारात मिळणारे आंबे नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत की कॅल्शियम कार्बाइडसारख्या केमिकलने, हे ओळखणं महत्त्वाचं आहे. तुमच्या आरोग्यासाठी घरीच या 5 सोप्या टेस्ट करून पाहा.
Image credits: Getty
Marathi
पाण्याची टेस्ट
एका बादलीत पाणी भरून घ्या आणि त्यात आंबे टाका. जर आंबे बुडाले, तर ते नैसर्गिकरित्या पिकलेले आहेत. पण जर ते पाण्यावर तरंगले, तर समजा की ते केमिकलने पिकवलेले आहेत.
Image credits: Getty
Marathi
दाबून तपासा
नैसर्गिक पिकलेला आंबा दाबल्यावर थोडा मऊ लागतो. पण बाहेरून पिवळा दिसणारा आंबा दाबल्यावर काही ठिकाणी कडक लागत असेल, तर समजा तो अजून पूर्ण पिकलेला नाही.
Image credits: Getty
Marathi
रंगावरूनही ओळखता येतं
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या छटा एकत्र दिसतात. पण जर आंबा एकसारखा पिवळाधम्मक दिसत असेल, तर तो केमिकलने पिकवलेला असू शकतो.
Image credits: Getty
Marathi
वास घेऊन पाहा
नैसर्गिक पिकलेल्या आंब्याचा सुगंध लगेच ओळखता येतो. देठाजवळ वास घेतल्यास गोड आणि तीव्र सुगंध येतो. केमिकलने पिकवलेल्या आंब्याला एकतर वास येत नाही किंवा केमिकलचा उग्र वास येतो.
Image credits: Getty
Marathi
कापून तपासा
आंबा कापल्यानंतर आतला रंग पाहा. नैसर्गिक आंब्याचा गर गडद पिवळा, केशरी आणि रसरशीत असतो. बाहेरून पिवळा असूनही आतला गर पांढरट किंवा फिकट पिवळा असेल, तर तो रसायनांनी पिकवलेला असू शकतो.
Image credits: Getty
Marathi
अशाप्रकारे खाणे सुरक्षित
आंबे खाण्यापूर्वी किमान 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ धुऊन खा. असं करणं आरोग्यासाठी सुरक्षित असतं.