देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीचा IPO लवकरच बाजारात दाखल होत आहे. या कंपनीने शेअरची किंमत जास्त ठेवली आहे.
या आयपीओमध्ये पैसे लावणे सोपे राहणार नाही. या आयपीओमध्ये पहिल्याच दिवशी ८,३१५ कोटी रुपयांपर्यंत भरणा झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ह्युंदाई कंपनी या आयपीओमधून २७,८७० कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओची साईज ही एलआयसीच्या आयपीओपेक्षा मोठी आहे.
१५ ऑक्टोबरपासून या आयपीओमध्ये पैशांची गुंतवणूक करता येणार असून १७ ऑक्टोबर ही शेवटची तारीख राहणार आहे.
या कंपनीचा शेअर आपल्याला विकत घ्यायचा असल्यास १,८६५ ते १,९६० रुपयांपर्यंत एका शेअरची किंमत राहणार आहे. कंपनीने काही शेअर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहेत.