ATM मधून PF कसा आणि केव्हा काढता येणार?, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!
Utility News Dec 14 2024
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Freepik
Marathi
स्पेशल डेबिट कार्ड EPFO सदस्यांसाठी एक नवीन सुविधा
EPFO ने एक स्पेशल डेबिट कार्ड लॉन्च करण्याची योजना केली आहे, जे पीएफ खात्याशी लिंक असणार आहे. या कार्डामुळे EPFO सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील रक्कम थेट काढता येईल.
Image credits: Freepik
Marathi
थेट एटीएमद्वारे सहज रक्कम काढा
नवीन डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही कोणत्याही एटीएमवर जाऊन तुमच्या पीएफ खात्यातून थेट रक्कम काढू शकता. हे पूर्णपणे तुमच्या बँक खात्याशिवाय, सोप्या आणि त्वरित पद्धतीने होईल.
Image credits: Freepik
Marathi
अर्जाची गरज नाही, क्लेम प्रक्रिया सोपी!
सध्याच्या प्रणालीत, तुम्हाला पीएफ रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन क्लेम दाखल करावा लागतो. पण EPFO च्या नवीन सिस्टिममध्ये अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही थेट एटीएमद्वारे पैसे काढू शकता.
Image credits: Freepik
Marathi
केव्हा काढता येईल पैसे?, मे ते जून 2025 मध्ये सुरुवात
EPFO 3.0 ची योजना येत्या मे ते जून 2025 दरम्यान लागू होईल. या काळात, सदस्यांना त्यांचे पीएफ 50% पैसे थेट एटीएमद्वारे काढता येतील.
Image credits: Freepik
Marathi
कर्मचाऱ्याचा मृत्यू, वारसदारांना सुविधा
कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याचे वारसदार त्याच्या पीएफ खात्यातील रक्कम एटीएमच्या माध्यमातून काढू शकतात. हे पैसे काढण्यासाठी, वारसदारांचे खाते पीएफ खात्याशी जोडलेले असणे आवश्यक.
Image credits: Freepik
Marathi
EDLI योजनेतून मिळणारा विमा, 7 लाख रुपयांपर्यंतची मदत
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंत विमा दावा मिळू शकतो. या रकमेची काढणी सुद्धा एटीएमद्वारे केली जाऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
भविष्याची आशा, EPFO चा EPFO 3.0 सुधारित सिस्टिम
EPFO 3.0 अंतर्गत नवीन सुविधा कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा बदल ठरू शकतो. यामुळे पीएफ काढणे आणखी सोपे, त्वरित, आणि अधिक सोयीस्कर होईल.