डोळ्याखाली काळे डाग आलेत, घरच्याघरी या ५ उपायांनी घालवा डार्क सर्कल्स
Utility News Mar 25 2026
Author: vivek panmand Image Credits:Gemini AI
Marathi
डार्क सकर्ल्सचे वाढले प्रमाण
सध्याच्या काळात डार्क सर्कल्स अनेकांना प्रॉब्लेम जाणवत असल्याचं दिसून आलं आहे. झोपेची कमतरता, रक्त कमी होणे हा प्रॉब्लेम अनेकांना जाणवत असतो. आपण यावर उपाय करू शकता.
Image credits: Gemini AI
Marathi
चेहरा खराब होण्याची शक्यता
केमिकलची उत्पादने वापरल्यामुळं आपला चेहरा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण घरच्या घरी साधे घरगुती उपाय करून पाहायला हवेत.
Image credits: norafatehi@instagram
Marathi
ताजी कोरफड
आपण झोपताना ताज्या कोरफडीचा गर काढून डोळ्यांखाली लावायचा. आपण सकाळी चेहरा धुवून काढायचा, त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स निघून जायला मदत होते.
Image credits: norafatehi@instagram
Marathi
बटाटा
बटाट्याचे काप करून डोळ्यांवर ठेवा किंवा बटाट्याचा रस काढून डोळ्याच्या खाली लावा. त्यानंतर १० ते १५ मिनिट ते तसेच ठेवा. नंतर डोळे स्वच्छ धुवून काढा.
Image credits: norafatehi@instagram
Marathi
गुलाब पाणी
गुलाब पाणी हा पदार्थ आपल्या प्रत्येकाच्या घरी असायला हवा. गुलाब जलाने डोळ्यांचा मसाज करा. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जायला मदत होईल.