आता आपण UPI द्वारे ATM मध्ये पैसे जमा करू शकणार आहोत. भारतीय रिझर्व्ह बँकेने या नवीन सुविधेचा प्रारंभ केला आहे.
ऑटोमेटेड डिपॉझिट कम विथड्रॉल मशीन (एडीडब्ल्यूएम-ऑटोमेटेड डिपॉझिट कम विथड्रॉल मशीन) हे एटीएमचा एक प्रकार आहे. या मशीनद्वारे रोख रक्कम जमा आणि काढता येते.
पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त 1,00,000 रुपये किंवा जास्तीत जास्त 200 नोटा स्वयंचलित डिपॉझिट कम विथ ड्रॉल मशीनद्वारे जमा करू शकतात.
युनियन बँक ऑफ इंडियाचे ग्राहक ऑटोमेटेड डिपॉझिट कम विथ ड्रॉल मशीनद्वारे जास्तीत जास्त 200 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक एका दिवसात ऑटोमेटेड डिपॉझिट कम विथ ड्रॉल मशीनद्वारे 49,900 रुपये जमा करू शकतात. डेबिट कार्डद्वारे 2 लाख रुपये जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.