जेवणाची चव वाढवणारं मीठ आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतं, हे जाणून घेऊया. जास्त मीठ खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवतात ते पाहू.
जास्त मीठ खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. शरीरात सोडिअमचं प्रमाण वाढल्याने रक्तवाहिन्यांवर दाब येतो.
रक्तातील अतिरिक्त सोडिअम बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त काम करावं लागतं. यामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.
मिठाच्या अतिसेवनामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
जास्त मीठ खाण्याच्या सवयीमुळे हाडांचं आरोग्य बिघडतं. यामुळे हाडं कमकुवत होऊ शकतात.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) निर्माण होते. यामुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास त्यातील सोडिअममुळे त्वचेच्या समस्याही निर्माण होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, मिठाच्या अतिसेवनामुळे पक्षाघात म्हणजेच स्ट्रोकचा धोकाही वाढतो. त्यामुळे मीठ प्रमाणातच खावं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शिफारशीनुसार, एका व्यक्तीने दिवसाला दोन ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्लं पाहिजे.
Toe Ring Designs: पायांना लाभेल फुलपाखरांचा स्पर्श, बटरफ्लाय जोडव्यांच्या ६ ट्रेंडी डिझाइन्स
पायाला द्या रंगीत शाईन, मीनाकारी पायलला बजेट मिळेल रॉयल्टी
साऊथ इंडियन चांदबाळीच्या ६ लेटेस्ट डिझाइन्स, महिला दिसेल सुंदर
घराचा कोणा कोणा दिसेल सुंदर, या डेकोरेटिव्ह लूकने घर टाका सजवून