२६ ऑगस्ट जन्माष्टमीची रात्र तंत्र उपायांसाठी खास आहे. या रात्रीला मोहरात्री असेही म्हटले जाते. आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
जन्माष्टमीच्या रात्री लक्ष्मी मंत्रांचा जप करणे चांगलं समजलं जात. या दिवशी राशीच्या नियमानुसार आपण लक्ष्मी मंत्रांचा जप करायला हवा.
जन्माष्टमीच्या रात्री दक्षिणावर्ती शंखाची पूजा करून तो तिजोरीमध्ये ठेवून द्या. शंखाला देवी लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते.
जन्माष्टमीच्या रात्री २१ दिव्यांमध्ये शुद्ध गायीचे तूप टाकून आपण श्रीकृष्णांची पूजा करू शकता. यामुळे लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहून घरात सुख समृद्धी राहील.
जन्माष्टमीच्या रात्री श्रीकृष्णासोबत रुख्मिणीचा गायीच्या दुधाने अभिषेक करा. यावेळी मंत्र म्हटल्यास आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.